२० जानेवारी

      ।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।


आपण जितके जास्तीत जास्त मनन, चिंतन करू, चांगले गुण आत्मसात करू, तितका आपल्याला उत्तरोत्तर फायदाच होईल. ज्याप्रमाणे खडीसाखरेचा खडा तोंडात टाकला की तो शेवटपर्यंत गोडच असतो, तसेच अध्यात्माचे आहे. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला की, जीवनाचा अंतही गोडच होणार यात शंका नाही. 

तुम्हाला शिष्य होण्याची इच्छा असल्यास अवश्य व्हा. पण त्यासाठी स्वतःची पात्रता वाढावा. कारण दूध एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओततांना दुसरे पात्रही तेवढेच स्वच्छ असणे आवश्यक असते. यासाठी आपल्या जवळचे शरीर व मनरूपी पात्र हेही स्वच्छ करून घ्या. गुरूंनी तुम्हाला केव्हाही तपासून पहिले तर, तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजे.    
 
।। श्री गुरुदेव दत्त ।।

१९ जानेवारी                                                                                    २१ जानेवारी