१९ जानेवारी

      ।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।


आपण नेहमी मंदिराची पायरी होऊन राहावे. पायरी होऊन राहण्यात एक आनंद असतो व फायदाही असतो. भगवंताची दृष्टी कळसापेक्षा पायरीवरच पडण्याची शक्यता आहे. समर्थ रामदासांनी सांगितले आहे की," तुम्ही  कुणीही व्हा, पण रामदासी होऊ नका !" कारण हे जीवन फार अवघड आहे. 

जसा कुंभार माठाला आकार देतो ना, तसेच सद्गगुरू आपल्याला आकार देण्यासाठीच आलेले असतात. उत्तम आकार प्राप्त होईपर्यंत माठाने (भक्ताने) कुरकुर करता कामा नये. उत्तम आकार आल्याशिवाय जशी माठाला बाजारात किमंत प्राप्त होत नाही, तसेच मानवालाही उत्तम आचरणांचा आकार जर नसेल तर त्याचीही किंमत समाजात किंवा आध्यात्मिक क्षेत्रात शून्यच राहणार! मातीच्या गोळ्याला बाजरात कुणी मूल्य देते का? नाही ! तसेच सद्गगुरू हे मानवाच्या मौल्यवान करीत असतात.  
 
।। श्री गुरुदेव दत्त ।।

१८ जानेवारी                                                                                    २० जानेवारी