।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
विनोद म्हणजे मनाचा मोकळेपणा आहे. ही मनोवृत्ती दुष्ट माणसाच्या ठायी असू शकत नाही. आपण आपले मन मोकळे करण्यासाठी एकतरी व्यक्ती प्रेमाची, विश्वासाची असू द्यावी. मन मोकळे होणे आवश्यकच असते. नाहीतर मनावर, डोळ्यांवर ताण पडतो व तो वाढत जातो. आपल्या मनाला टोचणाऱ्या आणि अगदी असह्य झालेल्या काही गोष्टी श्रीगुरूंनाही सांगायला हरकत नाही. त्यामुळे मार्गदर्शनही मिळेल व मनही मोकळे होईल. शरीराला जशी विश्रांती, निवारा हवाच असतो, तसेच मनालाही हवे असते. यासाठी देवस्थानात येऊन नुसत्या दर्शनानेसुद्धा आपल्या मनाला केवढी शांतता व आधार मिळाला हे आपण सर्वजण अनुभवानेही सांगू शकाल.