।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
ज्ञान व विज्ञान या दोन्हीही गोष्टी सत्पुरुषांना माहिती असतातच. विज्ञानावर किती विश्वास ठेवायचा व ज्ञानाने तो कसा जाणून घ्यायचा हे त्यांना माहिती असते.
यासाठीच सत्पुरुष म्हणतात, " त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ! " सत्पुरुषांची जागा हे सर्व शिकवण्यासाठी आहे. त्यांची आज्ञा शिरसांवद्य मानावी व त्यानुसार आचरण करावे. शिक्षण, पैसा, सोंदर्य यांचा मद मनुष्याला लवकर चढतो. म्हणून थोडे सावध राहावे. अहंकाराच्या स्वाधीन होऊ नये. यासाठी जीवनात गुरूंची आवश्यकता असते. मनुष्य पैशाने मोठा झाला म्हणून मान राखण्याचे कारण नाही, पण मनुष्य गुणांनी मोठा झाला तर अवश्य मन राखावा. मान राखताना पैसा, सोंदर्य विचारात घेऊ नये. गुणांचीच पारख करावी.