१६ जानेवारी

     ।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।


मनुष्याला राग, क्रोध आहेच. पण मनुष्य म्हटला की त्याच्या प्रत्येक कृतीला मर्यादा ही आहेच. तो आपल्या इच्छेने काहीच करू शकत नाही. आयुष्य, आहार, निद्रा, रती या सर्वांनाच मर्यादा आहेत. एवढेच काय, पण तो स्वतःची उंचीसुद्धा इंचभरही वाढवू शकत नाही. यासाठी त्याने आपली मर्यादा ओळखूनच प्रत्येक गोष्ट करावी. राग, वैताग, संताप हे ५ ते १० मिनिटे पुरे. बाकी वेळ हसण्यात, आनंदात घालवावा. शांत असावे. जीवनात शिस्तही असावी पण ती जास्त असू नये. काही पदार्थांना कमी उष्णता देणेच चांगले नाहीतर ते करपून जातात. तसेच अती शिस्त असली की होते. 

त्याग करा म्हटल्याने त्याग होत नाही. त्यासाठी मिळविण्याचा हव्यास थांबवा. मिळविणारे मिळवीत राहातात, खर्च करणारे खर्च करीत राहातात व त्यातून हव्यास व गरजा वाढत राहातात.     



।। श्री गुरुदेव दत्त ।।

१५ जानेवारी                                                                                     १७ जानेवारी