।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
आपल्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचे अगत्य व आदरातिथ्य करावे. अगत्य व आदरातिथ्य यात अंतर आहे. अगत्य हे आलेल्या व्यक्तीचे असते, तर आदरातिथ्य हे व्यक्तीला बोलावून केले जाते. प्रापंचिक माणसाला हे आवश्यक असते. कारण आपण जे मिळवतो ते सर्व आपले नसते, याचा विचार करा.
जेवतांना स्वतः अन्न वाढून घेऊ नये. तसे केल्यास ते अन्न चोरल्याचे पातक आहे. जेवताना तोंडाचा आवाज करू नये. जेवण वाढताना विशिष्ट पद्धतीने वाढावे व ते जेवताना विशिष्ट पध्द्तीने जेवावे.अन्न हे संस्कार करूनच घ्यावे. शिवाय अन्न घेण्याच्या पद्धतीवरून गतजन्माच्या खुणा कळतात. यासाठी व्यवस्थित जेवण घेणे केव्हाही गरजेचेच आहे.