।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
अन्नप्राशन हे भूमीवर बसूनच करावे. भूमी ही भूदेवता आहे. अन्नदान करतानाही टेबल खुर्चीचा वापर करू नये. भूमीवर बसवूनच द्यावे. एरव्ही भूमी आपणास अन्न देऊन तृप्त करते. पण तिच्या तृप्तीचे दुसरे साधन काय? यासाठी अन्न भूमीवरच घ्यावे. वास्तुशांतीच्या वेळी ही गोष्ट अवश्य करावी. वास्तुपुरुष 'अस्तु अस्तु ' म्हणत राहिला पाहिजे. तो ' तथास्तु ' म्हणाला तर सर्व संपलेच म्हणून समजा ! वास्तुपुरुष शांत राहण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे घरांतील वसवसही शांत होते. शिवाय अन्नपचनही चांगले होते. आपल्याकडे अजूनही पूर्वीचे लोक ताटाभोवती पाणी फिरवून, घास जमिनीवर ठेवून भूमीला नमस्कार करतात. यात वास्तुपुरुषला तृप्त करणे हाच उद्देश आहे.