।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
प्रत्यकाने आपला धर्म व पावित्र्य हे शारीरिक व मानसिकरीत्या सांभाळले पाहिजे. त्यामुळे दुर्बुद्धी होणार नाही. कुठेही खाणे, कुणाचाही सहवास घेणे चांगले नाही. कारण या गोष्टींची सीमा संपली की, माणसाला दुर्बुद्धी व्हायला लागते. एरव्ही दोन पायांवर उभा असलेला मनुष्य एवढा बेभान, भयानक होतो कसा? त्याचे कारण हेच की, तो ह्या गोष्टी सांभाळीत नाही. आपण माणूस म्हणून जगायला लायक आहोत किंवा नाही हे एकदा तपासून पहिले पाहिजे. माणूस म्हटला की मनुष्य जन्माची लक्षणे नको का त्यात दिसायला? आपल्या मनात कशा प्रकारचे विचार येतात ते तपासून ठरवा. मनाचा शोध घ्या. भक्तीचे गुण कुणात किती उतरतात, हा ज्याच्या त्याच्या दैवाचा भाग आहे. पण बाकी मनुष्य म्हणून जे मानवी गुण असावे लागतात, ते ज्याचे त्यानेच आत्मसात केले पाहिजेत.