।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
प्रत्यकाने ' सोहम ' जप करावा. हा जप स्त्रियांनाही करता येतो. त्यामुळे अहंकाराची भावना जाते. अंहकार हा विषयाच्या अडथळ्यातून आलेला असतो. यातूनच क्रोध येतो. जपामुळे तो शांत होतो. शक्यतो हा जप पहाटे करावा. बाहेरचा आवाज, कटकटी साधनेत नसाव्यात. यासाठी स्नान वगैरे करण्याची गरज नाही. पहाटे उठून, चूळ भरून बसावे. चहापान करू नये. या जपामुळे इच्छा, वासनांवर नियंत्रण येऊन आनंद मिळेल. ' हृदयी गुरुनाथ प्रकटला ' असा अनुभव येईल. याला सोवळ्याची गरज नाही. स्नानाची गरज नाही. फक्त मन:स्थिती वेडीवाकडी होता कामा नये. हा जप तुम्हाला कामानिमित्त लॉजवर थांबलात तरी करता येतो. उदबत्ती लावून केल्यास जास्त चांगले !