११ जानेवारी

   ।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।


रोजच्या कामाव्यतिरीक्त काहीतरी उद्दिष्ट ठरवा व त्या दिशेने वाचाल करा. तसेच उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय विश्रांतीचीही वाट पाहू नका. जीवनाला काहीतरी उद्दिष्ट असावे लागते, उद्दिष्टहीन जीवन व्यर्थ आहे. उद्दिष्ट ठरवले की मन त्यात गुंतून राहते, त्यातून आनंद मिळतो व मनाचे विकार यामुळे नष्ट होतात. हे उद्दिष्टही आपल्या कुवतीनुसार ठरवावे व कार्याला लागावे. 

मी स्वतः भक्तिमार्गाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व त्या मार्गाने वाटचाल केली. याचबरोबर मी ही पण काळजी घेतली की, आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही. इतरांना त्रास न देता, पडेल तो त्रास सहन करीत मी आपल्या संकल्पनांना पूर्ण केले व भक्तिमार्गाच्या कार्यात पूर्णत्व प्राप्त केले. स्वतःच्या गुरूंची आज्ञाही पूर्णत्वाला नेली. हा आदर्श तुम्हीही डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. 


।। श्री गुरुदेव दत्त ।।

१० जानेवारी                                                                                     १२ जानेवारी