१० जानेवारी

  ।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।


सत्पुरुषांना सर्वसामान्यांना माहित असलेल्याच्या पलीकडचे सर्व माहित असते. म्हणून ते आपल्याला जे सांगतात ते अगोदर आपण ऐकले पाहिजे. 

याचबरोबर मनुष्य जीवनाला संकल्प असावा, ध्यास असावा. एकदा मनुष्याने संकल्प केला की केला मन हळूहळू त्या मार्गाने जाऊ लागते व ते काम पूर्ण होते. कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी संकल्पाबरोबर निरनिराळ्या योजनाही असाव्या लागतात. माझ्या गुरूंनी मला जे धर्मकार्य सोपिवले ते पूर्णत्वाला नेण्यासाठी मी निरनिराळ्या योजना केल्या. संपूर्ण जीवन त्यासाठी वाहून घेतले, मी संकल्प केला, कार्याचा ध्यास धरला व त्यामुळे हे कार्य पूर्णत्वाला नेऊ शकलो. परंतु या संकल्पाबरोबरच मी माझ्या जीवनाचा मुख्य आधार, माझे परमेश्वर, म्हणजे माझे गुरु श्रीनृसिंह सरस्वती, त्यानां एक क्षणही विसरलो नाही. 


।। श्री गुरुदेव दत्त ।।

९ जानेवारी                                                                                       ११ जानेवारी