।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
जो जो आपला ईश्वराचे ठायी विश्वास वाढेल. तो तो आपल्या काळज्यांचे प्रमाण कमी होईल. मनुष्य जीवनाची स्थितीच अशी आहे की, तो काळजीशिवाय राहून शकत नाही. साधे गजर लावून लवकर उठविण्याचे ठरविले तरी गजर होण्याआधी तो काळजीने जागा होतो व उठून घड्याळाकडे बघतो. मनुष्याला सारखी काळजी असते व त्यामुळेच त्याच्या जन्माला पूर्णत्व येत नाही. मनुष्य जीवनाला काळजी हा प्रकार एवढ्यासाठी लावून दिला आहे की, तो निष्काळजी होऊ नये. काळजीमुळे मनुष्य सतत सावध राहतो. संकटे आली तरी घाबरू नका, ईश्वरावर आणि आपल्या गुरूंवर विश्वास ठेवा. संकटाचा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. काळजी करावी पण सतत चिंतेत राहू नये. काही गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत, त्याबद्दल काळजी करण्यात अर्थ नाही. त्या भगवंतावर सोडून द्याव्यात. जर आपणच काळजी करीत बसलो, तर मग भगवंत निश्चित होतो. यायची आपण काळजी ही तात्पुरती करावी.