।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
दृढ व अमर्याद विश्वास हा एक फक्त ईश्वरावरच ठेवावा. कारण तो आपल्या विश्वासातच आहे. ईश्वराचे ठायी असा विश्वास ठेवण्यासाठी स्वच्छ मनाची गरज असते. मन स्वच्छ ठेवण्यासाठीही कर्माशिवाय पर्याय नाही. मनुष्य मागचे न फेडता आधी पुढचे कल्याण कसे होईल याचा विचार करतो. पण ईश्वरी सूत्र तसे नाही.
जीवनात सुखदुःख दोन्ही आपणच स्वीकारली पाहिजेत. कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत. हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल. आपण हे मागच्या जन्माचे फेडतोय, आता आपण तसे वागू नये, एवढं समजलं तर मनुष्याला दुःखच होणार नाही. यासाठी आपली शक्ती, सहनशीलता वाढवली पाहिजे. आपली योग्यता वाढवली पाहिजे व योग्यतेने इतरांचा आपल्या परिस्थीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पण त्यासाठी आपण स्वतः प्रयन्त करायला हवा.