।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
सतत नुसता पैसा मिळवीत राहणे ही पूर्ण सौख्य देणारी बाजू नाही. तर चिंता वाढवणारी बाजू आहे. अनावश्य्क वस्तूंच्या गरजा टाकून तो पैसा आवश्यक वस्तूंशी जोडावा म्हणजे तो आपोआप स्थिर होईल. संचय होईल,
नाहीतर होणार नाही. सपंत्ती ही आश्रयासाठी आहे, तीच संपत्ती जर बेचैन करीत असेल तर तिचा काय उपयोग?
जसं पाणी संथ गतीने चाललं तरी काही वेळाने समुद्राला मिळतंच ना ? तसंच जीवनाचं आहे. प्रयत्न करणं चुकीचं नाही,पण घाई करणं चुकीचं आहे.
पैशाचा लोभ धरू नका. स्वतः होऊन कोणी दिला तर गोष्ट निराळी. पण बळजबरीने घेतला. की,
तळतळाट आलाच. एकवेळ माणूस अपराधी झाला तर चालेले पण त्याचे मन अपराधी होता उपयोगाचे नाही. म्हणून कुणालाही लुबाडून फसवून बळजबरी करून संपत्ती मिळविण्याच्या फंदात पडू नका.