।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
आपण स्वतःला सांभाळणे आवश्यक आहे. कारण सद्बुद्धी व दुर्बुद्धी या दोघींचे वास्तव्य आपल्या एकाच शरीरात असते. जसे वारा घाणीवरून गेला तर त्याला घाण वास येतो व सुंगधित पदार्थावरून गेला तर त्याला सुंगधित वास येतो. वारा एकच आहे, मग त्याला दोन वास कसे ? असेच या शरीराचे आहे. एकाच शरीरात त्या दोन विभिन्न शक्ती आहेत पण आपण सद्बुद्धी प्राप्त करून घेतली पाहिजे.
मनाचे पावित्र्य कसे वाढवायचे याकडे लक्ष द्या. मग शरीराचा कल आपोआप तिकडे जाईल. कारण जसा टिपकागद टाकला तर तो शाई शोषून घेतो, पण साधा कागद टाकला तर शाई इकडे तिकडे पसरते. यासाठी मन हे टिपकागदासारखे करा की, ते पवित्र, उत्तम तेच शोषून घेईल.