।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
श्रद्धेशिवाय जीवन जगणे कठीण ! यासाठी मनाला श्रद्धेची जोड ही शिक्षणाबरोबर असलीच पाहिजे. मनुष्याने श्रद्धा ह्या स्वतः निर्माण कराव्यात व त्या सांभाळाव्यात. आपल्या जीवनात ज्या श्रद्धा आपण बाळगल्या आहेत त्या जर आपण सांभाळल्या नाहीत तर आपल्याला आपली विधायक शक्तीही सांभाळता येणार नाही. आपण या जर हृदयाच्या एका कोपऱ्यात सांभाळून ठेवल्या तर त्याठिकाणी एक शक्ती उत्पन्न होते व ती शक्ती आपल्या उपयोगी पडते. जोपर्यंत आपल्याला कुणीही हात लावणार नाही.
ज्याप्रमाणे आगगाडीला ब्रेक लावला की सर्व डबे आपोआप चालण्याचे थांबतात, त्याप्रमाणे ह्या ईश्वरी शक्तिचे आहे. ती एकदा श्रद्धेने आत्समात केली की दुष्टचक्रे आपोआप थांबतात किंवा या दृष्टचक्रपासून आपल्याला संरक्षण तरी मिळते.