।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
गुरुसेवा करताना काहींना त्रास सोसावा लागतो, काहींना अपमान सहन करावा लागतो. ह्याचा प्रत्यय बराच जणांना ' वेदान्त ' इमारतीकरिता मदत मागण्याच्या वेळी आला असेल. नाना प्रकारचे शेरे, ताशेरे ऐकवले गेले असतील. पण गुरूंनी भक्तांना भिक्षा मागायला सांगण्याचे कारण एकच की अंहकार कमी व्हावा, ' मी ' पणा कमी व्हावा.
प्रत्येकाने ही भावना ठेवली पाहिजे की आपल्या जीवनात जे काही यश मिळते, आनंद मिळतो, त्याला आपले गुरु कारणीभूत आहेत. अशी भावना दृढ झाल्याने, तुम्हाला कोणताही अंहकार होणार नाही. " महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती ! " जेव्हा महापूर येतात तेव्हा अहंकाराने ताठ उंच उभी राहिलेली झाडे वाहून जातात, परंतु
नम्रतेने खाली वाकलेली लव्हाळी जशीच्या तशी राहतात.