२ जानेवारी

।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।


कोणत्याही डॉक्टरी औषधोपचाराने हा अंहकार कमी होत नाही. तर त्यासाठी सत्पुरुषाचे पुन्हा पुन्हा दर्शन घेणे आवश्यक असते. अंहकारासारख्या दुर्गुणांमुळे माणसाला स्वतःच्या कतृत्वाचा व स्थितीचा फार अभिमान असतो. अहंकाराचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे जेवढा तुम्ही तो घालवायचा प्रयत्न कराल, तेवढा तो जास्त चिकटतो. 
जोपर्यंत साधक अहंकार घालवू शकत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती सामान्यच राहील. 

पाण्याची काही धरणे असतात, जेव्हा पाणी जास्त प्रमाणात साठते तेव्हा त्याच्या दाबाने धरणाची दारे आपोआप उघडतात व दाब कमी झाला की आपोआप बंद होतात. तसाच काहीसा प्रकार देवानेही योजलेला आहे. मनुष्य मर्यादेच्या वर गेला की आपोआप खाली आणला जातो व नेहमीच्या पातळीवर आणून ठेवला जातो. 


।। श्री गुरुदेव दत्त ।।

१ जानेवारी                                                                                         ३ जानेवारी