।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
जेथे आपण काही शिकण्यासाठी जातो , तेथे अगोदर अंहकार सोडावा लागतो.
श्रीगुरूंच्याजवळ येताना अगदोर अंहकार सोडा. आपण सामान्य आहोत असे समजून वागा .
म्हणजे तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील. अंहकार हा मनुष्याचा सर्वात मोठा दोष आहे.
मनुष्याला जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाचा अंहकार होतो. तेव्हा तो काही केल्या लवकर जात नाही.
रामदास स्वामी स्वतः समर्थ असून हातात झोळी घेऊन भिक्षा मागत होते व तसे करण्यास शिष्यांना सांगत होते,
हे सर्व अंहकार कमी करण्याकरताच.
आपले कर्तृत्व व यश हे ईश्वराकडे सोपवावे .केवळ ईश्वरकृपेमुळेच हे सर्व होऊ शकते असा भाव मनात ठेवला म्हणजे मनुष्य निरहंकारी होऊ लागतो व जसजसे तुम्ही निरहंकारी होऊ लागता, तसतसे देव तुमची काळजी अधिक घेतात.