।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
काही लोक सत्पुरुषांविषयी गैरसमज करून घेतात व त्यांच्याकडे जात नाहीत. हे चांगले नाहीत. गैरसमज कुणाबद्दल करून घ्यायचा यालाही काही मर्यादा आहेतच. ज्यांच्याशी आपला देण्याघेण्याच्या काहीच व्यवहार नाही, त्यांच्याबद्दल गैरसमज तरी कशाला हवा ? गुरूंशी आपला व्यवहार असा काहीच नसतो. मग गैरसमजाचे कारण तरी काय ? हे सर्व समजायला फार मोठा काळ जावा लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की, गुरुपद सर्वात उच्च असे फार पद आहे. येथे वयाची मर्यादा नसते. येथे ज्ञानाची, तपश्चय्रेची कसोटी लावली जाते. त्यामुळे त्यांच्या कार्यात कुठेही उणेपणा जाणवत नाही. ईश्वर तर आपल्याला जन्माला घालून भोग भोगण्यासाठी पृथ्वीतलावर सोडून देतो. पण या भोगातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र 'गुरूच' दाखवितात, एवढे गुरूंचे श्रेष्ठत्व असते !