उपवासाची भजी

साहित्य : एक वाटी भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ, अर्धी वाटी वरई ( भगर ), अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, तीन चमचे नारळचव, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, मीठ, कोथिंबीर, रिफाईंड तेल.

कृती :  दोन तास वरई भिजत ठेवावी. नंतर उपसून हिरव्या मिरची, जिरे घालून वरई बारीक वाटावी. वरई पिठात साबुदाणा पीठ, मीठ, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट घालून भज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवून ठेवावे.  नारळचव मिक्सरमधून थोडा बारीक करून पिठात मिसळावा. भजी खुसखुशीत होतात. रिफाईंड तेलात भजी तळून काढावीत. गरम भजी खजुराच्या गोड चटणीबरोबर छान लागतात. एक वाटी घट्ट दही घुसळून घ्यावे. दह्यात मीठ, साखर, १ चमचा दाण्याचे, कोथिंबीर घालावी. एक हिरवी मिरची जाडसर वाटून दह्यात घालावी किंवा अर्धा चमचा लाल तिखट घालून दह्यातील चटणी तयार करावी. उपवासाच्या भजीबरोबर दह्यातील चटणी चांगली लागते.