उकड पेंडी

साहित्य : एक वाटी ज्वारीपीठ, अर्धी वाटी कणीक, अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ, दोन कांदे, दोनतीन हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धी वाटी आंबट ताक, हिंग, मीठ,कोथिंबीर.

कृती : कांदा बारीक चिरून घ्यावा. हिरव्या मिरचीचे तुकडे करावेत. कढईत तीन चमचे तेलाची मोहरी, जिरे,हिंग, कढीलिंब घालून फोडणी करावी. फोडणीत मिरची तुकडे, कांदा घालून परतावे. नंतर त्यात ज्वारीपीठ, कणिक, हरभरा डाळीचे पीठ घालून खमंग भाजावे. ओवा, मीठ, चिमूटभर साखर घालावी. चार वाट्या गरम पाणी घालावे. ताक घालावे, गाठी होऊ न देता पीठ खालपासून नीट हलवावे. झाकण टाकून वाफ आणावी. हलवून पुन्हा झाकण टाकावे. गॅस मंद ठेवा. गरम उकड पेंढीवर कोथिंबीर, खोबऱ्याचा किस घालून सजवावे.