साहित्य : अर्धा किलो सालासकट मूग, अरही वाटी कडुलिंब पाने, १ वाटी कोथिंबीर, १ चमचा जिरे, ४ हिरव्या मिरच्या, १०० ग्रॅम पनीर, मीठ, तेल, तीन सिमला मिरच्या, दोन लाल गाजरे, दोन कांदे, अमूल बटर.
कृती : गाजरे किसून घ्यावीत, कांदा, सिमला मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. पनीर किसून घ्यावे व मूग भिजत घालून पाणी उपसून ठेवावे. मूग, कडुलिंब, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे, एकत्र करून पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. १ चमचा तेलावर गाजराचा कीस, सिमला मिरच्या, कांदा. मीठ घालून परतावे. भाज्या मऊ झाल्या की मिरपूड घाला, पनीर कीस घालावा. तव्यावर तेल - मुगाचे मिश्रण उत्तप्यासारखे घालावे. कडेने थोडे बटर सोडून झाकण टाकून वाफ काढावी. मग सुकी भाजी वर घालावी. गुंडाळी करून दोन तुकडे करून चटणीबरोबर सर्व्ह करावी.