हॅश ब्राऊन

साहित्य : ४ मोठे चमचे तेल, अर्धा किलो बटाटे उकडून व स्लाईस करून, १ मोठा चमचा कांदा बारीक कापून, दीड छोटा चमचा मीठ, १ छोटा चमचा काळी मिरपूड, १ लिंबू. 

कृती : एका डिशमध्ये बटाट्याच्या स्लाईसेस पसरवून ठेवा. तेल चांगले कडकडीत गरम करा व स्लाइसेसवर पसरावा. वरून कांदा पसरवा. मीठ व मिरपूड भुरभुरवा. मध्यम आचेवर दाबून लालसर रंगाचे होईपर्यंत फ्राय करा. हळूच पलटवा व दुसऱ्या बाजूने गडद लाल होऊ द्या. वाढताना लिंबू पिळा व सॉससोबत वाढा