कृती : मिठाच्या पाण्यात कणसं उकडून घ्या. पाण्यातून काढून थंड होऊ द्या. लोण्यामध्ये ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस, लसूण व काळी मिरपूड घालून मिनिटभर फेटा. एका थाळीत ओता. ब्रेडचा चुरा व कोथिंबीर दुसऱ्या थाळीत पसरावा. कणसांना लोण्याच्या मिश्रणात घोळून ब्रेडच्या चुऱ्यात फिरावा. सर्व बाजूंनी चुरा व्यवस्थित लागल्यावर ओव्हन किंवा गॅसच्या मंद आचेवर ब्रेडचा चुरा लाल सोनेरी होईपर्यंत परतावा. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत वाढ.