साहित्य : दीड वाटी कणिक, अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ, अर्धी वाटी तांदूळ पिठी, एक वाटी कोबी कीस, एक वाटी गाजर कीस, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा तिखट, एक चमचा लिंबूरस चवीला साखर, मीठ, तेल.
कृती : सर्व पिठे एकत्र करून चिमूटभर हळद, मीठ, तीन चमचे गरम तेलाचे मोहन, पाव चमचा तिखट घालून पीठ भिजवून ठेवावे. कोबी, गाजर, खोबरे कीस एकत्र करून त्यात तिखट, मीठ, कोथिंबीर, लिंबूरस, साखर घालून मिसळून सारण तयार करून ठेवावे. भिजवलेल्या पिठाची पातळ पुरी लाटून त्यावर सारण घालून बंद करावे. करंजीसारखा आकार द्यावा, अगर घट्ट गुंडाळी करून ( रोल ) तोंड बंद करावे. गरम तेलात तांबूस रंगावर तळुन काढावी.