कृती : ओव्हन १८० डिग्रीवर आणून ठेवा. पोळ्यांना दोन्ही बाजूंना तेल चोळून बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. दहा मिनिट लाल होईपर्यंत बेक करा.
एका फ्राईंगपॅनमध्ये उरलेले तेल गरम करून सिमला मिरची घाला व नरम झाल्यावर सलगम, मीठ व तिखट घालून ३ - ४ मिनिट शिजवा. ग्रिल गरम करून ठेवा. तयार भाजी बेक केलेल्या पोळ्यांवर ठेवा. किसलेले पनीर वरून भुरभुरवा. सोनेरी रंगाचे होईपर्यंत ग्रिल करा. वरून कोथिंबीर, कांद्याची पात किंवा सोया भुरभुरवून गरमच खायला द्या.