साहित्य : ४ मोठे बटाटे उकडून व सोलून, १ पातीचा कांदा कापून, १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ चमचा मीठ, १ चमचा लाल तिखट, १ मोठा टोमॅटो कापून, ३ मोठे चमचे तेल (कॉर्न ऑइल ), दीड चमचा जिरेपूड , पापडाचे त्रिकोणी तुकडे
कृती : ओव्हन १५० डिग्रीवर तापवा. एका मोठ्या वाटीत तेल व जिरेपूड घाला. चमच्याने फेटून चांगली एकत्र करा. पापडाचे तुकडे बेकिंग ट्रेमध्ये ठेवा व जिरेपूड घातलेले तेल तुकडयांच्या दोन्ही बाजूला लावून पापड सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत बेक करून घ्या. ओव्हन नसल्यास पापड तेलामध्ये तळून घ्या. एका चांगल्या बाउलमध्ये बटाटा, कांदा, लिंबाचा रस, मीठ, तिखट व टोमॅटो घालून चांगले मिसळा व बाउल सर्व्हिंग डिशच्या मध्यभागी ठेवा. बाऊलच्या सर्व बाजूंनी पापडाचे तुकडे सजवा आणि आस्वाद घ्या.