साहित्य : 1 कप मशरूम्स उकडून कापून, अर्धा किलो टोमॅटो, ३ कप नूडल्स उकडून,अर्धा कप किसलेला पनीर, १ कांदा बारीक कापून, १ चमचा आले किसून, दीड चमचा मीठ, १ चमचा लाल तिखट, २ मोठे चमचे तेल. कृती : तेल गरम करून कांदा अगदी लाल होईपर्यंत परता. आले व उकडलेले मशरूम्स घालून ४ - ५ मिनिट परता. पनीर, मीठ व तिखट घाला. चांगले मिसळून टोमॅटो घाला व मंद आचेवर सॉस बनेपर्यंत ठेवा. नूडल्स घालून चांगले मिसळा. घट्टपणा आल्यावर उतरावा व गरमागरम वाढा.