मिंसट्रोन सूप

साहित्य : १ कांदा, १ चमचा लसूण, १ गाजर, २ सेलरीची पाने, १ बटाटा, ५० ग्रॅम पानकोबी, थोडी कांद्याची पात हे सर्व साहित्य बारीक चिरून, अर्धा लिटर व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, १५० ग्रॅम टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल ६० मिली, चीज १ क्युब बारीक किसून, चवीनुसार ओरेगॅनो, मीठ व मिरपूड चवीनुसार. 

कृती : एका भांड्यात तेल गरम करून कांदा व लसूण सोनेरी होईपर्यंत परता. त्यात सेलरी, गाजर व बटाटे घालून २ - ३ मिनिटे शिजवा. कांद्याची पात व कोबी घालून पाच मिनिट शिजवा. कापलेला टोमॅटो व व्हेजिटेबल स्टॉक घालून उकळी आणा. मंद आचेवर भाज्या अगदी नरम होईपर्यंत शिजवा. मीठ, मिरपूड घालून ढवळा. वाढताना किसलेले चीज घालून सजवा.