साहित्य : २०० ग्रॅम ताजे बटण मशरूम्स, १ हिरवी सिमला मिरची एकेक इंचाचे तुकडे करून, २ कांदे बारीक चिरून, इंचभर आले, ५ - ६ लसूण पाकळ्या, ३ मोठे टोमॅटो बारीक चिरून ( दीड कप ), १ - २ सुक्या लाल मिरच्या, १ मोठा चमचा धणे, पाव छोटा चमचा मेथीदाणे, एक छोटा चमचा मीठ, १ छोटा टोमॅटो दोन तुकडे करून ( सजावटीसाठी ), २ हिरव्या मिरच्या पातळ पट्ट्या कापून (वाटल्यास ), ४ मोठे चमचे तेल.
कृती : आले व लसणाची पेस्ट तयार करा. लाल मिरची व धणे जाडसर वाटून घ्या. मशरूम्स स्वच्छ धुवून घ्या. त्यांचा आकार छोटा असेल तर ते अख्खेच ठेव अन्यथा प्रत्येकाचे दोन दोन तुकडे करा. पुसून कोरडे करा. एका कढईत ४ मोठे चमचे तेल गरम करा. मशरूम्स घालून ते दहा मिनिट अधूनमधून परतवत रहा. शिजल्यानंतर बाजूला काढून ठेवा. त्यात तेलामध्ये मेथीदाणे घाला. सोनेरी झाल्यावर धणे - तिखटाचे पूड घाला. टोमॅटो घालून ७ - ८ मिनिट तेल सुटेपर्यंत परतवा. मीठ घाला. सिमला मिरची घालून परतवा. पाव कप पाणी व मशरूम्स घाला. गॅसवरून उतरवा. टोमॅटो आणि मिरच्यांच्या पट्ट्यांनी सजवा व गरम चपात्यांसोबत वाढा.