गाजर आणि कोथिंबिरीची सूप

साहित्य : ४ मोठे चमचे बटर, ३ पातीचे कांदे स्लाईस करून, ४५० ग्रॅम गाजर, १ मोठा चमचा धणेपूड, ५ कप चिकन स्टॉक किंवा पाणी, अर्धा कप गोड घट्ट दही, चवीनुसार मीठ, मिरपूड, २- ३ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी. 

कृती : एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. पातीचे कांदे आणि गाजर घालून चांगले परतवा. झाकण ठेऊन दहा मिनिट शिजवा. भाज्या मऊ व्हायला हव्यात. धणेपूड घालून मिनिटभर परतवा. स्टॉक घालून मीठ मिरपूड घाला. उकळी आल्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर वीस मिनिट शिजवावे. थोडे थंड झाल्यावर मिक्सरमधून प्युरी बनवून घ्या. ही प्युरी पुन्हा पातेल्यात ओतून वरून दही घाला व हलकेसे गरम करा. पुन्हा उकळी येऊ देऊ नका.