एग चीज


साहित्य : १ कप फुलकोबीचे स्वच्छ तुकडे, १ कांदा कापून, २ उकडलेली अंडी छिलून व कापून, ३ मोठे चमचे कणीक, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, २ मोठे चमचे मऊ लोणी, २ कप दूध, अर्धा चमचा सुकलेला पुदीना, १०० ग्रॅम पनीरचे तुकडे तळून, सव्वा चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरपूड.

कृती : कोबी व कांदा मिठाच्या पाण्यात मध्यम उकडून घ्या. एका बेकिंग डिशमध्ये कोबी व कांदा ठेऊन वरून अंड्याचे तुकडे घाला. एका पातेल्यात कणिक, गरम मसाला, तिखट, लोणी, दूध, पुदिना, मीठ, काळी मिरपूड घाला व गँसवर ठेवा. घट्ट होईपर्यंत परतावा. खाली उतरवा. त्यात पनीरचे तीन चतुर्थांश तुकडे घाला. बेकिंग ट्रेमध्ये खाली अंडयांचा तुकड्यांचा थर देऊन त्यावर हे मिश्रण घाला. उरलेले पनीरचे तुकडे वर घाला. ग्रिल गरम करून पनीर सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत बेक करा.