सजावटीसाठी : मिरच्या, टोमॅटो, कांद्याच्या चकत्या व लिंबाची साल
कृती : चणे रात्रभर पाण्यात भिजत घाला. पाणी काढून टाका व पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा. पुन्हा पाणी काढून टाका. ३ - ४ कप पाण्यात टी - बॅग बुडवून एक उकळी आणा. थोडा वेळ आच मंद करा. चण्यामधील पाणी वेगळे काढा व बाजूला ठेवा. भांड्यात तीन मोठे चमचे तेल गरम करा. पाणी काढून टाकलेले चणे घालून पाच मिनिट परतवा. आता हे चणे बाजूला काढून ठेवा. दुसऱ्या भांड्यात तीन मोठे चमचे तेल गरम करा. वेलची आणि जिरे घाला. जिरे सोनेरी झाल्यावर कांदा घाला व सोनेरी होईपर्यंत परता. धणेपूड, आमचूर व लाल तिखट घाला. कांदा अगदी गडद करडा होऊ द्या परंतु जळणार नाही याची काळजी घ्या. टोमॅटो, गरम मसाला व आले घाला. टोमॅटो पूर्ण मऊ होऊ द्या व त्यांच्यातून तेल सुटू द्या. चणे घालून आणखी २ -३ मिनिट परता. आता मघाशी बाजूला ठेवलेले चहाचे पाणी यात हळूहळू ओता. मंद आचेवर १५ - २० मिनिट शिजवा. मिरच्या, कांदा, लिंबाची साल आणि टोमॅटो घालून सजवा.