भाजणीचे मुटके

साहित्य : दोन वाट्या भाजणीचे पीठ, एका वाटी मेथीचे पाने, एक चमचा धणे, जिरेपूड,५ - ६ हिरव्या मिरच्या, १० - १२ लसूण पाकळ्या, दोन चमचे नारळचव, कोथिंबीर, मीठ, तेल, दोन पतीचे कांदे.

कृती : मेथीची पाने धुऊन चिरून घ्यावीत, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, एकत्र बारीक वाटून घ्यावे. भाजणीच्या पिठात मेथीपाने, वाटलेले लसूण, मिरची, मीठ, धणे, जिरेपूड घालून पीठ घट्ट भिजवून ठेवावे.
भिजवताना थोडे पाणी वापरावे. तेलाचा हात लावून पिठाचे मुटके अथवा गोल रोल करून ठेवावेत. कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून मुटके डब्यात ठेवावेत. कुकरच्या पाण्याला उकळी आली की मुटके उकड्ण्यास ठेवावेत. शिटी न लावता १५ - २० मिनिटे मुटके उकडावेत, थंड झाल्यावर मुटक्याचे सुरीने गोल काप करावेत. कढईत दोन चमचे तेलाची मोहरी, जिरे, हिंग, कडीलिंब, हळद घालून फोडणी करावी. एक चमचा तीळ फोडणीत घालावे. काप फोडणीत घालून दोन मिनिटे परतावेत, वरून नारळचव, कोथिंबीर, कांदापात बारीक चिरून घालावी. खमंग मुटके दह्यातल्या काकडीच्या कोशिंबीरीसोबत वाढावे.